---Advertisement---

SBI कॉलनीत गौमातेच्या मृतदेहावर नगरसेविका सुष्माताई भिसे यांची तत्काळ मानवीय कार्यवाही

नगरसेविका सुषमा भिसे
---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील SBI कॉलनी परिसरात एका गौमातेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मृत गौमातेचा देह परिसरात पडून असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच नगरसेविका सुष्माताई भिसे यांनी तात्काळ पुढाकार घेत नगरपरिषदेमधील अधिकारी गजानन जायभाये यांच्याशी संपर्क साधला.

नगरसेविका सुष्माताई भिसे यांच्या विनंतीवरून नगरपरिषदेकडून JCB मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर गौलखेड रोड परिसरात योग्य ठिकाणी खड्डा करून गौमातेच्या मृतदेहाचे विधीपूर्वक दफन करण्यात आले.

या तातडीच्या आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेविकेच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. अशा मानवीय व सामाजिक जबाबदारीच्या कार्यामुळे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता अबाधित राहण्यास मदत झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment