संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने दि. १० मार्च २०२६ रोजी संस्थेच्या आवारात हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत हरभरा व तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रदीपभाऊ वडोदे यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आली.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांतारामभाऊ दाणे यांच्या वतीने प्रथम शेतकरी म्हणून संजय उकर्डा बोरसे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार, उपाध्यक्ष गणेश भुते, संचालक रमेश मारोडे, राजूभाऊ देशमुख, पुरूषोत्तम मुरुख, निरंजन इंगळे उपस्थित होते. तसेच भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, राजुभाऊ ठाकरे, अभयसिंह मारोडे, नानाभाऊ पाटील, एकनाथ पाटील, गजानन ठाकरे, राजेश मुयांडे, सुधीर लव्हाळे, वासुभाऊ सडतकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याशिवाय संस्थेचे व्यवस्थापक एम. एस. धाडे, केंद्रप्रमुख ए. एस. धोरण, शुभम सर गायकी, संस्थेचे कर्मचारी, हमाल व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमीभाव खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)








