---Advertisement---

टाकळी धारव येथे हातभट्टी दारूसह इसम अटकेत!

---Advertisement---

शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : हातभट्टी दारूची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला शेगाव ग्रामीण पोलिसांनी 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता टाकळी धारव परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 550 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.का. विजय साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टाकळी धारव येथे पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान अनिल आंकर भारसाकळे (वय 32, रा. टाकळी धारव) हा 5 लिटर हातभट्टी दारू प्लास्टिक कॅनमध्ये बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ त्याला अटक करून दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment