---Advertisement---

“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला” शेगांव येथे सुरुवात

---Advertisement---

शेगांव (सचिन कडूकार): शिवसेना संस्थापक व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” अंतर्गत आज संतनगरी शेगाव एसटी बसस्थानकावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी या विशेष मोहिमेची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनुसार राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर पुढील एक वर्षभर स्वच्छता व सौंदर्यीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

शहरी गटातील प्रथम क्रमांकाच्या बसस्थानकाला १ कोटी रुपये निमशहरी गटातील प्रथम क्रमांकाच्या बसस्थानकाला ५० लाख रुपये ग्रामीण गटातील प्रथम क्रमांकाच्या बसस्थानकाला २५ लाख रुपये देण्यात येणार आहे.

आज झालेल्या शेगाव बसस्थानकाच्या स्वच्छता मोहिमेत बसस्थानकाचे वेळापत्रक रंगविणे, परिसराची सखोल स्वच्छता, वास्तूचे निरीक्षण तसेच कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची तपासणी करण्यात आली. यावेळी बसस्थानकाच्या विविध सुविधा, प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि परिसरातील स्वच्छतेचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले.

या मूल्यांकनावेळी प्रादेशिक व्यवस्थापिका कोकाटे मॅडम, वाहतूक निरीक्षक महेश पाटील, आगार व्यवस्थापिका शुभांगी पवार तसेच मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी केली. राज्यातील एसटी बसस्थानकांना स्वच्छ व आकर्षक बनवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, प्रवाशांच्या सोयीसुविधेत यामुळे मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment