---Advertisement---

भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय; मालिका 2-2 ने बरोबरीत

---Advertisement---

लंडन : ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर सहा धावांनी नाट्यमय विजय मिळवत कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत युवा भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या युवा भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी तब्बल 374 धावांचे आव्हान ठेवले होते.

आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ एकेकाळी विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र अखेरच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी जिद्दीची कमाल दाखवत इंग्लंडला गुडघे टेकायला भाग पाडले. अखेरीस इंग्लंडचा डाव अवघ्या 368 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने सहा धावांनी अविस्मरणीय विजय मिळवला.

या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली असून हा सामना आगामी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढवणारा ठरला आहे. युवा खेळाडूंच्या धैर्यशील कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटने पुन्हा एकदा ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment