---Advertisement---

वैभवचा वादळ, भारताचा इतिहास; U19 विश्वचषक सहाव्यांदा तिरंग्याचा

U19 World Cup India
---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा) : अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाने 411 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडला 311 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.

वैभव सूर्यवंशीचा वादळी शतकाने इतिहास

या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला वैभव सूर्यवंशी. त्याने केवळ 80 चेंडूत 175 धावा करताना 15 चौकार आणि 15 षटकार लगावले. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. फायनलमध्ये 350+ धावा करणारा भारत हा पहिला संघ ठरला.

कर्णधाराची जबाबदारीची खेळी

कर्णधार आयुष म्हात्रेनेही महत्त्वाची साथ देत 51 चेंडूत 53 धावा केल्या आणि डाव मजबूत केला.

गोलंदाजांचा दमदार मारा

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली, मात्र अंबरीश सुकुमारने 3 विकेट घेत सामन्याची दिशा भारताच्या बाजूने वळवली. इंग्लंड 177/7 अशी अडचणीत असताना कॅलेब फॉकनरने 67 चेंडूत 115 धावा करत झुंज दिली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

सहाव्यांदा विश्वविजेता भारत

या विजयासह भारताने अंडर-19 विश्वचषक सहाव्यांदा जिंकत स्वतःचाच विक्रम आणखी भक्कम केला. ऑस्ट्रेलिया (4 वेळा) नंतर भारत सर्वाधिक वेळा विजेता ठरणारा संघ आहे. इंग्लंडसाठी 28 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.

सामन्याचा थोडक्यात आढावा

  • भारत: 411 धावा
  • इंग्लंड: 311 धावा
  • निकाल: भारताचा 100 धावांनी विजय
  • स्थळ: हरारे, झिम्बाब्वे
  • मॅन ऑफ द मॅच: वैभव सूर्यवंशी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment