---Advertisement---

दिशा रावणचवरेची राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेस ऐतिहासिक निवड !

---Advertisement---

शेगांव (सचिन कडुकार) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावती जिल्हा हौसी जिमनॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अमरावती विभागीय जिमनॅस्टिक क्रीडा स्पर्धा ही नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत 19 वर्षांखालील वयोगटामध्ये जय गजानन ज्युनिअर कॉलेज, जलंब (ता. शेगांव) येथील विद्यार्थिनी कु. दिशा रविंद्र रावणचवरे हिने रिदमिक जिमनॅस्टिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला यथोचित न्याय देत तिने विभागात घवघवीत यश संपादन करत राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी (नागपूर येथे होणाऱ्या) निवड मिळवली आहे. ही केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

कु. दिशाच्या या यशामागे तिच्या कठोर परिश्रमांबरोबरच तिच्या पालकांचे व प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न बिरकड साहेब, प्राचार्या सौ. कल्पना सुरळकर मॅडम, तसेच प्रशिक्षक व उत्कृष्ट मार्गदर्शक श्री. राहुल पहुरकर सर यांनी तिचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment