---Advertisement---

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिगांव प्रकल्पासाठी ₹२,३९९ कोटी निधी मंजूर!

---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी असून, जिगांव सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आमदार डॉ. संजय कुटे हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून तसेच शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत जिगांव सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधीची ठाम मागणी केली होती.

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या या मागणीची व विनंतीची गंभीर दखल घेत माननीय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिगांव सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ₹२,३९९ कोटींचा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती दिली आहे.

प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती

एकट्या जिगांव सिंचन प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांना मोठी चालना मिळणार असून, प्रकल्प पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करणार आहे.

१ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

जिगांव सिंचन प्रकल्पामुळे जळगाव जामोद मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा अनुशेषातून अधिशेषाकडे वाटचाल करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास १ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, याचा थेट आणि दीर्घकालीन फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.

🚜 परिवर्तन घडवणारा ऐतिहासिक प्रकल्प

जिगांव सिंचन प्रकल्प हा केवळ पाणीपुरवठ्याचा प्रकल्प नसून, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा, समृद्धीचा आणि विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. शेती उत्पादनात वाढ, उत्पन्नात स्थैर्य, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

🙏 आमदार डॉ. संजय कुटे यांचे आभार प्रदर्शन

या दूरदर्शी, विकासाभिमुख व शेतकरीहिताच्या निर्णयासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, हा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment