---Advertisement---

जि.प. शिक्षक दीपक उमाळे यांचा आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार…

---Advertisement---

बुलडाणा (सचिन कडूकार) : जळगांव जामोद तालुक्यातील चारबन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दीपक उमाळे यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करताना माजी कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगांव जामोद येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार केला.

कार्यक्रमात डॉ. कुटे यांच्या हस्ते उमाळे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गजानन सरोदे, निलेश शर्मा, पांडुरंग बावस्कर, ऍड. दिलीप खोदरे, संजय बोरसे, मोहित सरप आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा राज्यभरातून एकूण १०९ शिक्षकांची निवड झाली असून, बुलडाणा जिल्ह्यातून दीपक उमाळे हे एकमेव प्राथमिक शिक्षक म्हणून गौरवले जाणार आहेत.

गेल्या ११ वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले उमाळे यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या भाषिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी द्विभाषिक शब्दकोश तयार करून स्थानिक बोलीभाषेच्या आधारे शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी अधिक घट्ट जोडून ठेवण्यात यश मिळाले आहे.

या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाकडून दीपक उमाळे यांना गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा गौरव स्थानिक पातळीवरही करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment