---Advertisement---

खतांच्या दरात २५० रुपयांची उसळी; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट!

---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा) : अलीकडील काही महिन्यांत रासायनिक खतांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या खर्चाचे गणित कोलमडले आहे. केंद्र शासनाकडून दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने खतांच्या किंमतीत फेरबदल होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.

रासायनिक खतांच्या गोण्या तब्बल २०० ते २५० रुपयांनी महागल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी शेणखताचे दरही प्रचंड वाढले असून, एका ट्रॅक्टर–ट्रॉलीसाठी शेतकऱ्यांना ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात झपाट्याने वाढ होत आहे. खतांच्या उपलब्धतेतील अडचणी आणि वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून खतांचा तुटवडा दिसत असून, दरवाढीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचे ओझे वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. खतांच्या या वाढीव दरामुळे पिकांचे उत्पादन खर्च दुपटीने वाढणार असल्याने आगामी हंगामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या रबी हंगामातील पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, रासायनिक खतांच्या किंमती आटोक्यात न ठेवता वाढवण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. सोयाबीन, गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी खतांचा पुरवठा कमी होत असल्याने पेरणीपासून वाढवणीपर्यंतचा संपूर्ण खर्च वाढत असून त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकूणच, खतांचा तुटवडा, वाढलेली किंमत आणि पिकांच्या खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले असून, तातडीने उपाययोजना न केल्यास याचा मोठा फटका आगामी हंगामाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment