---Advertisement---

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बुकिंग कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवस!!

---Advertisement---

नवी दिल्ली (आकाश बोरसे): मध्य-पूर्वेतील युद्धामुळे जागतिक पातळीवर तेल व नैसर्गिक वायू पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस केला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना दोन सिलिंडर बुकिंगदरम्यान किमान २४–२५ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे. म्हणजेच एखाद्या ग्राहकाने जर १ तारखेला गॅस सिलिंडर बुक केला असेल तर पुढील बुकिंग २५ तारखेपूर्वी करता येणार नाही.

ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी निर्णय

केंद्र सरकारने हा निर्णय ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काही ठिकाणी साठेबाजी वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने हा प्रतिबंधात्मक उपाय केला आहे.

इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण

पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की सध्या देशात घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र अनावश्यक साठेबाजी टाळण्यासाठी आणि वितरण सुरळीत ठेवण्यासाठी बुकिंग कालावधी वाढवण्यात आला आहे.

काही दिवसांत दुसरा बदल

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवस केला होता. आता त्यात पुन्हा वाढ करून २५ दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment