---Advertisement---

संत नगरी शेगावातून “महाडिबेट” चे थेट प्रक्षेपण; राष्ट्रपती दौऱ्यावर गांधी चौकात रंगणार राजकीय-सामाजिक महामंथन

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तपत्र): संत नगरी शेगाव येथे भारताच्या राष्ट्रपतींच्या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गांधी चौकातून “महाडिबेट” चे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे. या विशेष चर्चासत्रात शहरातील प्रमुख राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून राष्ट्रपती दौऱ्याचे महत्त्व, शहराची तयारी, विकासाच्या संधी आणि जनतेच्या अपेक्षा या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

या “महाडिबेट” मध्ये नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, ज्ञानेश्वर आप्पा साखरे, शैलेंद्र दादा पाटील, पवन महाराज शर्मा, किरण बापू देशमुख, अंकुश बापू देशमुख, नाना पाटील, पत्रकार फहीम भाऊ देशमुख आणि भूषण दाभाडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती दौऱ्यामुळे शेगावच्या विकासाला मिळणारी चालना, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये होणारे बदल आणि प्रशासनाची तयारी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

गांधी चौक हे शेगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे होणाऱ्या थेट प्रक्षेपणामुळे नागरिकांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता येणार आहे. तसेच नागरिकांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि विकासाच्या संधींबाबत थेट चर्चा होणार असल्यामुळे या “महाडिबेट” ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रपतींच्या आगमनामुळे शेगाव शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने रस्ते, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित “महाडिबेट” हे शहराच्या भविष्यासाठी दिशा देणारे आणि नागरिकांना माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment