---Advertisement---

महायुती एकजूट आहे “भाजप-शिंदे गटात दुरावा नाही”; CM फडणवीस!

---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. स्थानिक पातळीवरील वाद, तक्रारी आणि घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर गेल्याचेही वृत्त समोर आले होते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही दुरावा वाढल्याची चर्चा सुरू होती.

मात्र या सर्व चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. महायुतीत कोणतीही मतभिन्नता नसून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध पूर्वीइतकेच दृढ असल्याचे त्यांनी सांगितले. काहीजण हेतुपुरस्सर गैरसमज पसरवून वेगळेच चित्र उभे करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे स्पर्धा नैसर्गिकरित्या वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी मतभेद दिसले तरी त्यावरून महायुतीत फुट पडत असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अमित शाह यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्याच्या वृत्तालाही त्यांनी फेटाळून लावले.

आगामी निवडणुकांसाठी महायुती पूर्ण ऐक्याने लढणार असून विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवून दोन्ही पक्ष एकत्र काम करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment