---Advertisement---

शेगांवमध्ये महिलेवर मारहाण व शिवीगाळ; चुलत दीराविरोधात गुन्हा दाखल!

---Advertisement---

शेगांव (डी ललित) : शेगांव तालुक्यातील जगदंबा नगर परिसरात एका महिलेला मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अलका गणेश नवधळे (वय 31, गृहिणी, रा. जगदंबा नगर, शेगांव ) यांनी शेगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

दि. 04 डिसेंबर 2025 रोजी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी किचनमध्ये काम करत असताना त्यांचा चुलत दीर गजानन समाधान नवथळे हा दारूच्या नशेत किचन मध्ये आला. त्याने फॉर्म कोणाला विचारून भरला, तसेच घरात येऊन किती वर्षे झाली अशा कारणांवरून फिर्यादीला प्रश्न विचारत वाद घातला. फिर्यादीने “नवऱ्याच्या सांगण्यावरून फॉर्म भरला” असे सांगितल्यावर आरोपीने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली.

फिर्यादीच्या सांगण्यानुसार, आरोपीने अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर “नंगे नाच” असे म्हणत फिर्यादीला चापटा मारल्या. त्याचवेळी सासूने सुद्धा शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या सर्व प्रकारामुळे फिर्यादीने आपल्याला आरोपीकडून जीविताचा धोका असल्याचेही पोलिसांना कळविले.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ अपसदरचा गुन्हा दाखल केला. दाखल अधिकारी नापोका निलेश गाडगे यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास बीट पोहेकॉ संजय कुरुटले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment