---Advertisement---

शिक्षक दिनानिमित्त मलकापूर येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 सोहळा संपन्न

---Advertisement---

मलकापूर (युवा क्रांती वृतसेवा) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथील भातृ मंडळ येथे “नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025” हा भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य, कला, वैद्यकीय सेवा, उद्योजकता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी ८५५ ऑनलाइन प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी काटेकोर निवड प्रक्रियेनंतर १५० मान्यवरांना नॅशनल आयकॉन पुरस्कार 2025 प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यात शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या ११० शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे, प्राचार्य, व्ही. बी. कोलते इंजिनियरिंग कॉलेज हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाई अशांत वानखेडे, संस्थापक – समतेचे निळे वादळ; धनश्रीताई काटीकर पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष – हिंदी मराठी पत्रकार संघ; बाळासाहेब दामोदर, उद्योजक; ॲड. सम्यक चवरे; दामोदर शर्मा, शेतकरी नेते; तसेच शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते – विजयकुमार डागा, दिलीप आढाव, सरिता पाटील, विद्या काळबांडे, डॉ. प्रदीप गायकी इत्यादी.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या सोहळ्यात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, कला, वैद्यकीय सेवा, कायदा, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. तसेच देशासाठी प्राणाची परवा न करता सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिलांसाठी मानाचा समजला जाणारा आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असलेल्या भगिनींचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गंणगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश थाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधाकर तायडे, नथूजी हिवराळे, विनायक तळेकर, विजय भगत, मयूर लड्डा, आत्माराम मोरे, भाऊराव व्यवहारे, राजू घाटे, अमोल वानखेडे, ऋषिकेश तेजेकर आणि मुकुंदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 – पुरस्कार प्राप्तांची क्षेत्रनिहाय माहिती:

शैक्षणिक – ४३ सामाजिक – २७ पत्रकारिता – ४२ स्थानिक शिक्षक – ८६ आरोग्य – २८ प्रशासकीय विभाग – २ साहित्य – ३ कृषी – ३ उद्योजक – २ पर्यावरण – २ सामाजिक संस्था – २ कला – ७ वैद्यकीय – ७ क्रीडा – ६

या सोहळ्याने शिक्षक दिनाचे औचित्य अधिक उजळून निघाले असून विविध क्षेत्रांतील योगदानाला मान्यता मिळाली. अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेरणा निर्माण होऊन नवी पिढी उत्कृष्ट कार्यासाठी पुढे येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी अशा गौरव सोहळ्यांची गरज अधोरेखित करत सत्कारार्थ्यांचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment