शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : शेगांव तालुक्यातील पारिजात विद्यालय, मनसगावची विद्यार्थीनी कु. प्राची अमोल टवरे हिने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिमनॅस्टिक क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. प्राची ही पारिजात विद्यालय मनसगाव येथे बारावी कला शाखेत शिक्षण घेत असून तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय जिमनॅस्टिक क्लासचे संचालक व मार्गदर्शक राहुल पहुरकार, आई-वडील तसेच मातुश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव देशमुख, सचिव नलिनी ताई देशमुख, मुख्याध्यापक खुने सर, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक पवार सर आणि शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांना दिले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवल्यामुळे आता प्राचीला विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली असून तिच्याकडून उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कु. प्राचीचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.








