शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्यदक्ष समर्थक ज्यांनी शिवाजीराव बुरुंगले यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले, असे मोहम्मद जाफर यांचा वाढदिवस कॉंग्रेस कमेटीचे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या हस्ते उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मोहम्मद जाफर यांना शाल, श्रीफळ व हार अर्पण करून सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या आनंदात फटक्याची आतिषबाजी करण्यात आली असून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
वाढदिवस साजरा करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी मोहम्मद जाफर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.









