राजकीय वर्तुळात खळबळ; लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता !!
शेगांव (युवा क्रांती न्यूज) : सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील एक मोठा आणि प्रभावशाली वर्ग शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याच्या अंतिम टप्प्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका, नेत्यांचे वाढते संपर्क आणि हालचालींमुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विशेष म्हणजे हा वर्ग विविध सामाजिक, व्यावसायिक व राजकीय स्तरांवर प्रभाव राखणारा असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात काही महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
या संभाव्य प्रवेशामुळे शहरातील सध्याची राजकीय गणिते बदलू शकतात. काही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या सर्वांची नजर अधिकृत घोषणेकडे लागली असून, येत्या काही दिवसांत मोठा राजकीय निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











