मिरा-भाईंदर (युवा क्रांती वृत्तसेवा ) : मिरा-भाईंदर परिसरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. अजित पवार गटातील प्रमुख कार्यकर्ते इमरान हाशमी, आनंद सिंग तसेच भाजप नेत्या स्वप्नाली म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी या सर्व नवागतांचे मनापासून स्वागत करत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे अभिनंदन केले. ह्या प्रवेशामुळे मिरा-भाईंदरमधील शिवसेना (उभठा) पक्षाला स्थानिक स्तरावर मोठी ताकद प्राप्त झाली आहे.
या प्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक निलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “शिवसेना ही जनतेसाठी लढणारी संघटना आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वागत करताना आम्ही जनतेच्या हितासाठी अधिक बळकट पाऊले उचलू,” असे ते म्हणाले.
या प्रवेशामुळे आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









