---Advertisement---

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.

---Advertisement---

लातूर (युवा क्रांती वृतसेवा): यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या रेल्वे बोगी कारखान्यामध्ये स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी स्पष्ट निर्देश दिले. लवकरच या कारखान्यात वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, सुमारे 10,000 रोजगार निर्माण होतील.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या रोजगारासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये गरजेचे ट्रेड्स (अभ्यासक्रम) सुरू केले जातील आणि युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईल.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, जिल्हा रुग्णालय, जुने सिंचन प्रकल्प, तसेच उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा यावेळी आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदर डेअरीच्या सहकार्याने दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी घरणी, तिरू आणि देवर्जन प्रकल्पांतून जलवाहिनीद्वारे पाणी वितरणाची उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले. हाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला. काही पांदण रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब तात्काळ हटवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment