शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा ) : आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी नगर परिषदेतील प्रभागनिहाय आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. युवा क्रांती न्यूजच्या माहितीनुसार, एकूण १५ प्रभागांसाठी जागा ‘अ’ आणि ‘ब’ या दोन भागांमध्ये विभागण्यात आल्या असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व सर्वसाधारण घटकांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
प्रभाग १ मध्ये अ : अनुसूचित जाती महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग २ मध्ये अ : ओबीसी महिला ब : सर्वसाधारण ,
प्रभाग ३ मध्ये अ : अनुसूचित जमाती महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग ४ मध्ये अ : अनुसूचित जाती महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग ५ मध्ये अ : ओबीसी महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग ६ मध्ये अ : सर्वसाधाराण महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग ७ मध्ये अ : अनुसूचित जाती ब : सर्वसाधारण महिला,
प्रभाग ८ मध्ये अ : ओबीसी खुला ब : सर्वसाधारण महिला,
प्रभाग ९ मध्ये अ : ओबीसी महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग १० मध्ये अ : सर्वसाधारण महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग ११ मध्ये अ : ओबीसी खुला ब : सर्वसाधारण महिला,
प्रभाग १२ मध्ये अ : ओबीसी खुला ब : सर्वसाधारण महिला,
प्रभाग १3 मध्ये अ : ओबीसी महिला ब : सर्वसाधारण,
प्रभाग १४ मध्ये अ : ओबीसी खुला ब : सर्वसाधारण महिला,
प्रभाग १५ मध्ये अ : अनुसूचित जाती ब : सर्वसाधारण महिला
या आरक्षण सोडतमध्ये सर्वसाधारण जागेमध्ये १७ उम्मेदावर, ओबीसी मध्ये ८ उम्मेदावर, अनुसूचित जातीमध्ये ४ उम्मेदावर, अनुसूचित जमाती मध्ये १ उम्मेदावर जाहीर करण्यात आले.
या आरक्षण जाहीरनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उमेदवारीची चुरस सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात उमेदवारीसाठी तयारी सुरू केली असून, पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.









