श्री संत गोमाजी महाराज पुण्यतिथी उत्सव – नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे थोर संत श्री संत गोमाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आणि भक्तिमय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार दि. 29 जानेवारी ते गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
पारायण, हरीपाठ, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
या उत्सवानिमित्त भाविकांसाठी खालील धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे —
- श्री गोमाजी महाराज ग्रंथ पारायण
- ज्ञानेश्वरी पारायण
- हरीपाठ
- काकडा आरती
- कीर्तन सेवा
- गोंधळ
- गोपालकाला
- महाप्रसाद
दररोजचे कार्यक्रम वेळापत्रक :
- सकाळी 4.00 ते 6.00 — काकडा आरती
- सायंकाळी 5.00 ते 6.00 — हरीपाठ
- सकाळी 8.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 — ज्ञानेश्वरी पारायण
- रात्री 8.00 ते 10.00 — कीर्तन
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती
या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होणार असून त्यामध्ये —
- ह.भ.प. श्री कमलाकर महाराज कानडे (जवळा पळसखेड)
- ह.भ.प. सोपान महाराज खोंड (जवळा पळसखेड)
- ह.भ.प. निवृत्ती महाराज फाळके (शेगाव)
- ह.भ.प. विठ्ठल महाराज गावंडे (निपाणा)
- ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री (वाघजाळ फाटा आश्रम)
- ह.भ.प. रामेश्वर महाराज कंकाळे (गव्हाण)
- ह.भ.प. श्रीकांत महाराज राऊत (हाता)
तसेच ह.भ.प. गुरुवर्य सारंगधर महाराज पांडे गोळेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
5 फेब्रुवारी रोजी पालखी मिरवणूक व यात्रेकरिता प्रस्थान
- सकाळी 8.00 वाजता पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा
- त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता
- दुपारी 2.00 वाजता श्री संत गोमाजी महाराज पालखीचे संत मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान
आयोजकांचे आवाहन
हा पुण्यतिथी महोत्सव श्री गोमाजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नागझरी, ता. शेगाव, जि. बुलढाणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, व्यवस्थापक धनंजय आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











