मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : शेअर बाजारातील तुमची कधी, कोणती गुंतवणूक एखाद्याला लखपती किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन करोडपती करेल खात्रीने कोणीच सांगू शकत नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून कमीत कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. देशांतर्गत मार्केटमध्ये कमीत कमी गुंतवणुकीवर करोडपती बनण्याइतका परतावा देणारे असंख्य शेअर्स आहेत. यापैकी मोटारसायकल आणि तीन चाकी वाहने बनवणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनीने गेल्या 20 वर्षांत आपल्या भागधारकांना असाच मोठा परतावा दिला आहे.
एक लाखांवर दिला 1 कोटींपेक्षा जास्त परतावा
TVS मोटर कंपनीने 20 वर्षांत 1 लाख रुपयांवर एक कोटींपेक्षा जास्त परतावा दिलासा असून बोनस शेअर्सच्या आधारे कंपनीच्या शेअर्सनी ही कामगिरी दाखवली आहे. TVS मोटर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी, 5 सप्टेंबर रोजी 3,476.96 रुपयांवर बंद झाले तर, सोमवारी आठवड्याची हिरवीगार ओपनिंग केली आणि 3,544.90 वर झेप घेतली.
टीव्हीएस मोटर्सच्या शेअर्स खरेदी करणाऱ्यांचं दीर्घकाळात नशीब बदललं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्सनी 27,852% इतका शानदार परतावा दिला असून या काळात अनेक लोक लखपती-करोडपती बनले आहेत. त्याचवेळी, सरकारने जीएसटी दरांमध्ये कपात आणि गुरुवारी कंपनीच्या पहिल्या हायपर स्पोर्ट स्कूटरच्या लाँचनंतर, आता तज्ञांचा असा विश्वास आहे की कंपनीचे शेअर्स आणखी वाढण्याची शक्यता आहे.

1 लाख रुपये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले
2 सप्टेंबर 2005 रोजी TVS मोटर शेअर्सची किंमत फक्त 41.25 रुपये होती. या काळात एखाद्याने टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपयांना खरेदी केले असतील तर, त्यांना 2424 शेअर्स मिळाले असतील. या काळात TVS मोटरने सप्टेंबर 2010 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले म्हणजे, कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 1 बोनस शेअर दिला असून अशाप्रकारे पोर्टफोलिओमधील एका शेअर्सची संख्या 4,848 झाली असेल. 5 सप्टेंबर 2025 रोजी बीएसईवर TVS मोटर शेअर्स 3,476.95 रुपयांवर बंद झाले.
शुभमंगल ‘सावधान’! विवाह खर्च वाढणार, नव्या GST बदलांमुळे लग्नाच्या बजेटवर परिणाम होणार, समजून घ्या गणित
अशाप्रकारे, 4848 शेअर्सचे सध्याचे मूल्य 1.68 कोटी रुपये झाले असेल. या कॅल्क्युलेशनमध्ये कंपनीने दिलेला लाभांशचा समावेश नसून 2005 सालासाठी टीव्हीएस मोटर कंपनीच्या शेअर्सची किंमत स्क्रीनरमधून घेतली आहे. टीव्हीएस मोटर शेअर्सचा सर्वकालीन उच्चांक 3,550 रुपये तर 52 आठवड्याची नीचांकी पातळी 2170.05 रुपये आहे.










