शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : संतनगरी शेगाव येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता, ज.न.म. संस्थान, उपपीठ पश्चिम विदर्भ, चिंचोली फाटा (सवर्णा), खामगाव हायवे, ता. शेगाव, जि. बुलढाणा येथे पार पडणार आहे.
ही माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक सुरेश मोरे आणि पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांची मोठी परंपरा
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने केवळ आध्यात्मिकच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. त्यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश आहे:
- ग्रामस्वच्छता अभियान
- इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा
- मोफत वेदपाठशाळा
- रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय शिबिरे
- मोफत दवाखाना सेवा
- मरणोत्तर देहदान उपक्रम
- महाराष्ट्रभर ५३ मोफत रुग्णवाहिका सेवा (२४ तास उपलब्ध)
- महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई यंत्र वाटप
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन
- कायदेविषयक साक्षरता शिबिरे
विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ मध्ये अवघ्या १५ दिवसांत १,७१,१५० रक्तकुपींचे संकलन करण्यात आले. तसेच “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये १,१०,६८७ वृक्षारोपण करण्यात आले.
दीक्षा कार्यक्रम आणि महाप्रसादाची विशेष व्यवस्था
- २२ फेब्रुवारी २०२६ रोजी – साधक दीक्षा
- २३ फेब्रुवारी २०२६ रोजी – उपासक दीक्षा
तसेच, दोन्ही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने सर्व भाविक, साधक, शिष्य, हितचिंतक आणि नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








