---Advertisement---

नगरपालिका – नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात मोठा बदल!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीसंबंधी मोठा अपडेट समोर आला आहे. नागपूर खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय दिला असून त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही.

खंडपीठाच्या निर्णयानुसार, मतमोजणीची प्रक्रिया 21 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. हा आदेश निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्यतेसाठी घेण्यात आला असल्याचे न्यायालयाच्या अधिकृत घोषणेत नमूद केले आहे.

निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकारी यांना या आदेशानुसार आवश्यक ते सर्व नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे मतदान झालेल्या नागरिकांसाठी निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवस वाढेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment