पळशी झाशी येथे श्रद्धा आश्रम टुनकीचे श्री श्री 1008 गुरुवर्य आचार्य स्वामी गोविंद चेतन्यजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य टाळ–मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत गावातील श्री शंकरगिरी महाराज ढोल भजन मंडळ, स्वामी समर्थ भजन मंडळ, पार्वती माता भजन मंडळ, महिला भजन मंडळ तसेच बाहेरगावाहून आलेली भजन मंडळी सहभागी झाली. यापूर्वीही या मंडळांमार्फत शिवजयंती, शंकरगिरी महाराज पुण्यतिथी व महाशिवरात्री निमित्त मिरवणुका काढण्यात आल्या आहेत, हे विशेष.
मिरवणुकीनंतर झालेल्या प्रवचनात महाराजांनी दारूसेवनाचे दुष्परिणाम तसेच दैनंदिन जीवनातील नीतीमूल्यांविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास शिवसेना नेत्या सौ. जयश्रीताई शेळके, माजी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख तुकाराम यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.