शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय जनता पार्टी शेगांव ग्रामीण व भाजपा शेगांव शहर यांच्या वतीने आज ११ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त समर्पण दिवस व बलिदान दिवस म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांनी प्रास्ताविकातून दिनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष बापू देशमुख यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे आणि वैचारिक योगदानाचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पंडित दिनदयाळ उपाध्याय हे जनसंघ व भाजपा साठी संघटनात्मक व वैचारिक पाया मजबूत करणारे नेते होते. त्यांनी अखंड मानवतावाद आणि अंत्योदय ही विचारसरणी देशासमोर मांडली. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ११ फेब्रुवारी हा दिवस समर्पण दिवस म्हणून पाळला जातो.

उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते:
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष बापू देशमुख, जिल्हा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विजयभाऊ भालतडक, जिल्हा कार्यकारिणी सचिव राजुभाऊ हेलगे, जिल्हा सचिव सौ. अर्चनाताई बाठे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिलभाऊ उबंरकार, जेष्ठ कार्यकर्ते गजाननभाऊ डीगोळे, तालुका अध्यक्ष राजेंद्र ढोले, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, ग्रामीण सरचिटणीस रविंद्र उन्हाळे, निवृत्ती नांदोकार, शहर सरचिटणीस मंगेशभाऊ फुसे, चिटणीस राहुल लाड, नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, माजी नगरसेवक गजाननभाऊ जवंजाळ, नगरसेवक राजुभाऊ अग्रवाल, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष राजेश भाऊ शेजोळे, युवा मोर्चा अध्यक्ष सागरभाऊ बोळे, एससी मोर्चा अध्यक्ष पांडुरंग भाऊ सावरकर, राजुभाऊ जमाव, सचिनजी माळी, गोपाल भाऊ ठाकरे, प्रसिद्ध प्रमुख तुकारामभाऊ गायगोळ, अनिल चावरे, हरीश झाडोलिया, शहर सोशल मीडिया प्रमुख सौ. चेतनाताई खेते, ग्रामीण सदस्या सौ. सोनाली भालतडक व सौ. शारदा ढोले आदी उपस्थित होते.









