पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे): जागतिक महिला दिनानिमित्त पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने थोर समाजसेविकांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तबगार महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे, उपसरपंच कुसुमताई डाखोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य लीलाताई मुंडे आणि प्रियाताई गोल्हर यांच्या हस्ते कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका खराटे ताई, कंकाळ ताई, टापरे ताई, चव्हाण ताई, मुंडे ताई यांच्यासह असंख्य माता-भगिनी उपस्थित होत्या. तसेच ग्रामपंचायत शिपाई रमेश हातेकर, रोजगार सेवक देविदास मेहंगे, संजय मुंडे, भगवान मुंडे आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिलांनी समाजाच्या विकासात दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.(युवा क्रांती वृत्तसेवा)








