---Advertisement---

महाराष्ट्र पोलीस भरती 2025; एकूण 15,300 पदांसाठी सुवर्णसंधी!

---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. एकूण 15,300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

एकूण पदांची माहिती:

पदाचे नावपदसंख्या
पोलीस शिपाई (Police Constable)12,624
पोलीस शिपाई (वाहन चालक)515
पोलीस शिपाई (SRPF)1,566
पोलीस बॅन्डस्मन113
कारागृह शिपाई554
एकूण15,300 पदे

युनिटनुसार पदसंख्या (मुख्य जिल्हानिहाय):

मुंबई – 2643, पुणे – 1968, नागपूर – 725, ठाणे शहर – 654, नवी मुंबई – 527, मिरा भाईंदर – 921,
पिंपरी चिंचवड – 322, नाशिक ग्रामीण – 380, बुलढाणा – 162, जळगाव – 171,
गडचिरोली – 744, चंद्रपूर – 215, अमरावती – 214, बीड – 174, परभणी – 97,
कोल्हापूर – 88, वर्धा – 134, नागपूर ग्रामीण – 272, पालघर – 165 इत्यादी.


सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) गटानुसार पदे:

पुणे, नागपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर, काटोल आदी ठिकाणी एकूण 1500+ पदे उपलब्ध.


शैक्षणिक पात्रता:

  • पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF व कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुष:

  • उंची: किमान 165 से.मी.
  • छाती: 79 से.मी. (न फुगवता), 84 से.मी. (फुगवून)

महिला:

  • उंची: किमान 155 से.मी.

शारीरिक चाचणी:

  • धावणे: पुरुष 1600 मी. / महिला 800 मी. — 20 गुण
  • 100 मी. धाव — 15 गुण
  • गोळाफेक — 15 गुण
  • एकूण: 50 गुण

वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी):

पदवयोमर्यादा
पोलीस शिपाई, बॅन्डस्मन, कारागृह शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई (वाहन चालक)19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई (SRPF)18 ते 25 वर्षे
🟢 मागास प्रवर्गास ५ वर्षांची सवलत लागू.

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग – ₹450/-
  • मागास प्रवर्ग – ₹350/-

अर्ज प्रक्रिया: http://www.mahapolice.gov.in

अर्ज फक्त Online पद्धतीने करायचा आहे. अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
30 नोव्हेंबर 2025

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस विभाग.

सूचना:

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

“सेवा सुरक्षा आणि सन्मान” — महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची सुवर्णसंधी!
सर्व इच्छुक उमेदवारांना पोलिस भरती 2025 साठी हार्दिक शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment