सोनाळा (आकाश बोरसे ) : पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मिशन परिवर्तन उपक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशन सोनाळा मार्फत 12वी पास झालेल्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सराव परीक्षा रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता आदिवासी विद्यालय, टुनकी येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे करणार असून, अधिकाधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊन आपली तयारी अधिक मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सराव परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पहिल्या तीन क्रमांकाच्या परीक्षार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पोलीस भरतीसाठी योग्य दिशादर्शन व सरावाची संधी मिळावी यासाठी करण्यात आलेली ही पहल विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)












