शेगांव(डि ललित) : शेगांव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे घेतलेल्या कारवाईत मानिक स्टोअरजवळ देशी दारूसह एकाला रंगेहात पकडण्यात यश आले आहे. या कारवाईत एकूण रु. 1,09,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी पो.हे.का. संतोष शंकर गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश महादेव सोनोने (वय 33, रा. तिवान बु. ता. शेगांव) याच्यावर 09 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 01:44 ते 02:02 वाजेच्या दरम्यान पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून देशी दारू (टैंगो पंच कंपनी) 90 एमएलच्या 100 बाटल्या, किंमत रु. 4,000 , होंडा शाईन मोटरसायकल (क्र. MH 28 BV 5847), किंमत रु. 1,05,000 आणि कापडी पिशवी असा एकूण रु. 1,09,000 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनेचा दाखला नोंदवण्यात आला असून दाखला अधिकारी पो.हे.का इस्तेयाक यांनी तो नोंदविला. पुढील तपासाची जबाबदारी पो.हे.का. श्याम आघाव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
शेगांव पोलीसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा धक्का बसला असून पुढील तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)













