---Advertisement---

शेगांव निवडणुकीसाठी प्रहार पक्ष सज्ज, परवानगीची मागणी!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी शेगांव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेगांवमध्ये प्रचार आणि संघटनात्मक कार्यासाठी स्थानिक पातळीवर लढणाऱ्या उमेदवारांना परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार शेगांव यांना निवेदन सादर केले आहे. पत्राद्वारे त्यांनी नमूद केले की, शेगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधण्यासाठी व पक्षाचा प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी.

घोंगे यांनी नमूद केले की, प्रहार जनशक्ती पक्ष जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असून या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी पक्षाला स्थानिक स्तरावर प्रचार कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. तसेच नगराध्यक्ष पदासह इतर प्रभागांमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याची तयारी दर्शविली आहे.

या निवेदनावर तहसील कार्यालय शेगांवची प्राप्ती नोंद घेण्यात आली असून, लवकरच प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment