शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता कुरखेड गावाजवळ शेगाव-जलंब दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात सदर व्यक्तीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेल्वेची कटिंग झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून अंगावर लाल रंगाची हाफ बाहींची कॉलरची टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आढळली. त्याच्या उजव्या हातावर ‘ॐ’ तसेच ‘अमोल A S’ असे गोंदलेले आहे.
सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नसल्याने जलंब पोलिसांनी परिसरातील नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
मृतकाबाबत कोणतीही माहिती असल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
ठाणेदार अमोल सांगळे – मो. क्र. 9922001912
पोलीस हेड कॉन्स्टेबल नन्हेखा तडवी – मो. क्र. 9860168831
पोलीस कॉन्स्टेबल शांताराम घुये – मो. क्र. 9689799724
जलंब पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना विनंती करण्यात येते की माहिती मिळताच त्वरित संपर्क साधावा, जेणेकरून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात मदत होऊ शकेल.













