नागपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) : धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ७५व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत व्यापक धोरण राबवले जात आहे.

खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असून ‘मिशन ऑलिम्पिक’ अंतर्गत खेळाडूंची तयारी जोरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गत काही वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, अखिल भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल, राज्य असोसिएशनचे सचिव गोविंद मुथुकुमार तसेच मान्यवर उपस्थित होते.









