---Advertisement---

राज्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक !

---Advertisement---

मुंबई (युवा क्रांती वृतसेवा): राज्यातील प्रमुख ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी मंत्रालयात आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या बैठकीत ताराराणी समाधी (कोल्हापूर), अजिंक्यतारा किल्ला (सातारा) आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांसह राज्यभरातील अन्य अनेक ऐतिहासिक स्थळांच्या विकास आराखड्यांवर सविस्तर चर्चा झाली.

संबंधित विभागांनी प्रत्येक स्थळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सध्याची स्थिती आणि भविष्यातील विकास योजनांची माहिती सादर केली. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, “या स्थळांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपत त्यांचा सर्वांगीण विकास करणे ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. यासाठी आवश्यक निधी आणि प्रशासनिक सहकार्य वेळेत दिले जाईल.”

पर्यटनवृद्धीसोबतच इतिहासाची जपणूक आणि पुढील पिढ्यांना तो समजावून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बैठकीत काही आवश्यक सुधारणा व सूचना देण्यात आल्या असून लवकरच कार्यवाहीस गती देण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment