बुलढाणा |(डी ललित): बुलढाणा फिल्म सोसायटी यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार’ सोहळ्यात संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वीकार संस्थेच्या अध्यक्षा सौ. चंदा सुरेश ददगाळ यांनी केले. रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन येथे झालेल्या भव्य समारंभात विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
या प्रसंगी मंचावर चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- मोहन काळे
- सुभाष बावस्कर
- रफिक कुरेशी
- गणेश तांगडे
- भास्कर वाडेकर
या सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सौ. चंदा ददगाळ यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्याची दखल
सौ. चंदा ददगाळ या पारस परिसरात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संत गजानन बहुउद्देशीय संस्था समाजहितासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
34 वर्षांची चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
बुलढाणा फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष भास्कर वाडेकर हे गेल्या ३४ वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहेत.
- आतापर्यंत ३० शॉर्ट फिल्म्स
- ३२ माहितीपटांची निर्मिती
- २० देशांमध्ये व भारतातील १६ राज्यांत १०० पेक्षा अधिक फेस्टिव्हलमध्ये निवड
- ४५ “बेस्ट फिल्म” पुरस्कारांनी सन्मानित
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








