(युवा क्रांती वृत्तसेवा) : बिहार विधानसभेच्या निकालानंतर शहरात ढोल–ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या विजयोत्सवामध्ये वातावरण घोषणांनी दणाणून गेले. यावेळी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्याची जादू पुन्हा एकदा जनतेने मान्य केली आहे.”
एनडीए सरकारने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत केलेल्या सर्वांगीण विकासकामांचा थेट लाभ सर्व घटकांना झाला असून, त्याच विश्वासाच्या आधारे बिहारच्या जनतेने एनडीएला भरघोस पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, “जसा विश्वास बिहारच्या मतदारांनी दाखवला, तसाच सबळ विश्वास महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत महायुतीला नक्कीच देईल.”











