---Advertisement---

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शेगांव येथे जाहीर व्याख्यान!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शेगाव येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, धर्म आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध धारकरी कीर्तनकार ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

हा प्रेरणादायी कार्यक्रम सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण तांडी परिसर, श्रीकृष्ण नगर, डिवाईन कॅफे जवळ, शेगाव असे निश्चित करण्यात आले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व याबाबत या व्याख्यानातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इतिहासप्रेमी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (विभाग शेगाव) तसेच शंभुराजे सेवा ग्रुप, शेगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment