---Advertisement---

सोयाबीन, उडीद व मूंग हमीभाव खरेदीचा संग्रामपूरमध्ये शुभारंभ!

---Advertisement---

संग्रामपूर(आकाश बोरसे): संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या आवारात आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीन, उडीद व मूंग हमीभाव खरेदीचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते गजाननभाऊ सरोदे यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वासराव वरणकार उपस्थित होते. यावेळी प्रथम शेतकरी म्हणून राजेश शालीग्राम लोणाग्रे यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भुते, संचालक रमेश मारोडे, राजूभाऊ देशमुख, पुरुषोत्तम मुरुख, संजय वाकळे, प्रकाश उभे, निरंजन इंगळे तसेच भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, राजुभाऊ ठाकरे, संजय बोरसे, काशीनाथ मानकर, गजानन ठाकरे, राजेश मुयांडे, अनुप अवचार, सुधीर लव्हाळे, गोपाल बंड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन संस्थेचे व्यवस्थापक श्री. एम. एस. धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सर्व कर्मचारी, हमाल बांधव आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. हमीभाव खरेदीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरेदी प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment