शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : सार्वजनिक उत्सव समिती, शेगांव तर्फे शहर व ग्रामीण भागातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की, नवरात्रोत्सव काही दिवसांवर आला असून अद्याप ज्यांनी परवानगीसाठी अर्ज भरलेला नाही त्यांनी तातडीने अर्ज भरावा.
समितीच्या वतीने मंडळ प्रमुखांना कळविण्यात आले आहे की, परवानगी अर्जाची कागदपत्रे दि. 20 सप्टेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हॉटेल कृष्णा भोजनालय येथे जमा करावीत. सर्व मंडळांचे अर्ज एकत्रित करून समितीमार्फत पुढील प्रक्रियेसाठी सादर करण्यात येणार आहेत.
परवानगी अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –
- ऑनलाईन परवानगी अर्ज
- ध्वनी (साऊंड) परवानगी अर्ज
- नगर परिषद N.O.C.
- मंडळ सदस्यांची ओळखपत्रे व सदस्य यादी
अर्ज भरणे किंवा संबंधित कामात अडचण आल्यास सार्वजनिक उत्सव समितीचे कार्याध्यक्ष श्री. वरुण नागपाल (मो. 7030963134) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कागदपत्रे जमा करण्याचे ठिकाण : हॉटेल कृष्णा भोजनालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेगांव
— सार्वजनिक उत्सव समिती, शेगांव










