---Advertisement---

शाळकरी मुली व दिव्यांग महिलांसाठी अनुदान योजना !

---Advertisement---

या योजनेनुसार सन 2024-25 अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील 7 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींना लेडीज सायकल खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) पद्धतीने अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सन 2025-26 मध्ये जिल्हा परिषद सेस अंतर्गत दिव्यांग महिला आणि मुलींना पिठाची चक्की खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद आहे.

या दोन्ही योजनांसाठी पात्र महिला लाभार्थींनी आपल्या तालुक्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून विहीत नमुन्यात अर्ज प्राप्त करून, आवश्यक कागदपत्रांसह तो पूर्ण भरून सादर करणे अपेक्षित आहे. अर्जाचे नमुने व अटी-शर्ती संबंधित प्रकल्प कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर zpbuldhana.maharashtra.gov.in उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर 2025 असून, अर्ज स्वीकारण्याची कालमर्यादा 5 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक लाभार्थींनी आपले अर्ज बुलढाणा, चिखली, देउळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, मेहकर, मोताळा, नांदुरा, मलकापूर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यांतील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment