---Advertisement---

शरदसेठ अग्रवाल यांची भाजप-शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेते पदी एकमताने निवड!!

शरदसेठ अग्रवाल पक्षगटनेते पदी
---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगर परिषद पक्षगटनेतेपदी शरदसेठ अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड माननीय लोकप्रिय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. भाजप नेते विजय बाप्पु देशमुख, पुरुषोत्तम भाऊ शेगोकार, पांडुरंग भाऊ बुच, रविकांत दादा पाटील, नितीन भाऊ शेगोकार, तसेच शिवसेना नेते मा. संतोष भाऊ घाटोळ यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास भाजपा महिला अध्यक्षा अंजली ताई जोशी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सदस्यांच्या सहमतीने व विश्वासाने शरदसेठ अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शरदसेठ अग्रवाल यांचे अभिनंदन करत नगर परिषदेत विकासाभिमुख व लोकहिताचे निर्णय घेण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment