---Advertisement---

शेगांव पोलिसांना गांजा विक्री प्रकरणात यश! १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहर पोलिसांनी गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करत सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर २०२५) दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगांव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने जुने बसस्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ संशयित व्यक्तीवर छापा टाकला. या कारवाईत इब्राहीम शाह सरदार शाह (वय ४०, रा. इदगाह प्लॉट, शेगांव) या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीकडून ३ किलो ४०० ग्रॅम गांजा (प्रति किलो किंमत ₹२०,००० प्रमाणे एकूण ₹६८,००० रुपये), होंडा शाईन मोटारसायकल (MH-28-AE-2759) किंमत ₹७०,०००, लावा कंपनीचा मोबाईल (सिम क्रमांक ९६६५३६०८८०) किंमत ₹२,०००, काळी बॅग ₹१००, नगदी ₹२१०, तसेच १२ छोट्या पॉलिथीन पाकिटे असा मिळून एकूण ₹१,४०,३१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.५३ ते ३.४४ या वेळेत करण्यात आली असून, गुन्हा नोंद त्याच दिवशी सायंकाळी ६.३८ वाजता दाखल करण्यात आला.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार वासुदेव वानखेडे (बन क्रमांक १८७२) यांनी केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करीत आहेत.

शेगांव पोलिसांनी या कारवाईद्वारे शहरातील अंमली पदार्थविक्रीवर मोठा आघात केला आहे. पुढील तपासात या प्रकरणामागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment