---Advertisement---

शेगावातील डॉ. अण्णा भाऊ साठे नगर ‘आपला दवाखाना’मध्ये डॉक्टर व औषधांचा तुटवडा; गोपाल तायडे यांचे निवेदन

नगर परिषद निवेदन
---Advertisement---

डॉक्टरांची अनियमित उपस्थिती; नागरिक त्रस्त

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): डॉ. अण्णा भाऊ साठे नगर (म्हाडा कॉलनी) येथील ‘आपला दवाखाना’मध्ये विविध मूलभूत समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नियुक्त डॉक्टरांची नियमित उपस्थिती नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

औषधांचा तुटवडा

दवाखान्यात अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपला दवाखाना’ योजनेचा उद्देश मोफत ओपीडी सेवा, आवश्यक औषधे व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात या सुविधांचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाला निवेदन

या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यालय, बुलढाणा यांना पोस्टाद्वारे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नियमित डॉक्टरांची नियुक्ती व औषधांचा मुबलक साठा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा

समस्या लवकरात लवकर मार्गी न लावल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गोपाल तायडे यांनी प्रशासनाला दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही आरोग्य सुविधा सुरळीत करून ‘आपला दवाखाना’चा मूळ उद्देश पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment