---Advertisement---

शेगांव-बाळापूर रस्त्यावर रिक्षा अपघात; महिला ठार, अनेक जखमी!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 6 एप्रिल 2026- शहरातील गणेश नगर येथून शेतमजुरीसाठी निघालेल्या रिक्षाचा भीषण अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा क्र. MH28T 3882 (APE) सकाळी सुमारे 6 वाजता शेगांवहून बाळापूरच्या दिशेने निघाली होती. रिक्षामध्ये अंदाजे 6 ते 7 प्रवासी प्रवास करत होते. शेगांव-बाळापूर मार्गावरील यशोदा लॉनजवळ रिक्षा अचानक पलटल्याने हा अपघात झाला.

या अपघातात उमाबाई सुभाष अवचार (वय 40, रा. गणेश नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक गोपाळ सुरेश काठोळे (वय 35, रा. गणेश नगर) यांना गंभीर दुखापत झाली आहे. इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी निलेश गाडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला. जखमींना त्वरित योग साईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पुढील तपास शहर पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

⚠️ अपघाताचे संभाव्य कारण

रिक्षा अचानक पलटल्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, रस्त्याची स्थिती, वेग किंवा तांत्रिक बिघाड याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment