शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 5 (अ) येथे तिरंगी लढतीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून तीनही पक्षांच्या महिला उमेदवारांनी रिंगण गाजवले असून मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपकडून सौ. पल्लवी मोहन बनले, काँग्रेसकडून मालती काकासाहेब सोलनकर तर स्वतंत्र उमेदवार म्हणून योगिता गोपाल शर्मा मैदानात उतरल्या आहेत. तीनही उमेदवारांचा प्रचार वेग घेत असून प्रभागात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.
दरम्यान, स्थानिक मूलभूत प्रश्न, महिला कल्याणाचे मुद्दे तसेच नागरी सुविधा या प्रमुख विषयांवर उमेदवार जनसंपर्क साधत आहेत. मतदारांच्या मनात आपल्या बाजूने मतपरिवर्तन करण्यासाठी प्रत्येक उमेदवार विविध उपक्रम, भेटी आणि संवाद मोहीम राबवत आहे. समर्थकांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रभागात दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे.
प्रभाग 5 (अ) मध्ये नेमकी बाजी कोण मारणार, अंतिम निकाल कोणाच्या खात्यात जाणार आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने फिरेल—याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने प्रभागातील रंगत आणखी वाढणार हे निश्चितच आहे.












