शेगांव(डी ललित): दि. 28 फेब्रुवारी 2026 शेगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बनावट पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
📌 काय आहे प्रकरण?
पोलीस स्टेशन शेगांव ग्रामीण येथे इंद्रकुमार मुशीतलाल यादव (वय 22 वर्षे, रा. देऊर, पोस्ट कटेरा, तहसील नौरता, जि. मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विकास पाटील व त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा क्र. 75/2026 दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 309(6), 308(3), 318(4), 205 व 3(5) प्रमाणे कारवाई सुरू आहे.
🚨 कसा रचला कट?
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री शेगांव रेल्वे स्टेशन परिसरात आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून तक्रारदारास अडवले.
आरोपींनी त्याला दमदाटी करून जवळील ₹4,000 रोख रक्कम जबरदस्तीने घेतली. तसेच, “आम्ही पोलीस आहोत” असे सांगत बनावट ओळख दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
👥 आरोपींची नावे
- पंकज भिका सोनवणे (वय 25 वर्षे)
- कैलास प्रकाश डोकरत (वय 27 वर्षे)
- विशाल रमेशचंद्र झुंजारकर (वय 21 वर्षे)
(सर्व रा. गायगाव, ता. शेगाव)
👮♂️ पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा पु ढील तपास शेगांवग्रामीण पोलीस करीत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








