---Advertisement---

भाविकांना महत्त्वाची सूचना : रेल्वे प्रवासात ‘प्रसाद’ म्हणून दिलेले अन्न घेऊ नका – रेल्वे सुरक्षा बलाचा इशारा

रेल्वे सुरक्षा बल शेगांव
---Advertisement---

शेगाव (डी ललीत) : शेगाव ही श्री संत गजानन महाराजांची पावन भूमी असून येथे दररोज राज्यभरातून व देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक रेल्वेने प्रवास करून शेगावला पोहोचतात.

या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल (RPF) शेगाव यांच्याकडून भाविकांसाठी महत्त्वाची व कळकळीची सूचना देण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बल शेगावचे उपनिरीक्षक सदानंद माहुरे यांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रवासादरम्यान कोणी अनोळखी व्यक्ती ‘महाराजांचा प्रसाद’ म्हणून काही खाण्याचे पदार्थ देत असल्यास ते स्वीकारू नयेत. अशा पदार्थांमध्ये अनुचित किंवा गुंगीकारक वस्तू मिसळलेली असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच सामान चोरी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

जर अशी संशयास्पद कृती कोणी करताना आढळल्यास, प्रवाशांनी त्वरित रेल्वे मदत क्रमांक १३९ वर संपर्क साधावा किंवा गाडीत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही सूचना प्रवाशांचे हित व सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यात आली असून, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment