---Advertisement---

📰 दारूच्या नशेत मोटार सायकलवरून वाद; चौघांकडून तरुणासह कुटुंबीयांना मारहाण!!

---Advertisement---

शेगांव | (डी ललित): शेगांव शहरातील खळवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. मोटारसायकल देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी तरुणासह त्याच्या आई व भावाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

📍 घटनेचा तपशील

फिर्यादी तरुण हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, खळवाडी येथे मोटारसायकलवर बसलेला असताना विक्की गणेश सारवान (वय 32) हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याने मोटारसायकल देण्याची मागणी केली.

फिर्यादीने “तुम्ही दारू पिलेली असल्याने गाडी देऊ शकत नाही” असे सांगितल्यावर आरोपीने मोटारसायकलची चावी काढण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी तेथून निघून घरी गेला.

🏠 घरासमोर पुन्हा हल्ला

थोड्याच वेळात विक्की गणेश सारवान (32), धिरज गणेश सारवान (28), यश गणेश सारवान (20) व आकाश गणेश सारवान (30) हे चौघेही फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करत घराबाहेर येण्यास भाग पाडले.

त्या वेळी घरात फिर्यादी, त्याची आई रेणुका सारवान व भाऊ ज्ञानेश्वर सारवान उपस्थित होते. सर्व आरोपींनी चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, विक्की सारवान याने जमिनीवर पडलेला गट्टू (दगड) उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यामुळे डोके फुटून रक्तस्राव झाला. तसेच “आमच्या नादी लागलात तर जिवे मारू” अशी धमकीही दिली.

👥 साक्षीदारांनी सोडवले भांडण

घटनेच्या वेळी खळवाडी परिसरातील रिनाबाई अंभोरे व आकाश खंडारे हे उपस्थित होते. त्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.

🏥 वैद्यकीय तपासणी व गुन्हा नोंद

फिर्यादीच्या तोंडी अहवालासह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार बिट पोहेकॉ. रामदास घट्टे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलीस अधिक तपास करीत आहेत.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment