---Advertisement---

राहत्या घरात विवाहितेने जीव दिला; आईचा आक्रोश पाहून शेगांव सुन्न !

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. शेगांव येथील व्यंकटेश नगरात बुधवारी (10 सप्टेंबर) संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान या विवाहितेने जीव दिला. दिपाली विशाल बेलोकार (वय 31) असं या विवाहितेचं नाव असल्याची माहिती आहे.

दिपाली बेलोकार या विवाहितेने शेगांवात राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. दिपालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. जीव दिलेल्या दिपालीच्या आईने याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या सर्व घटनाक्रमाला तिचा मोठे दीर संदीप सुपडा बेलोकार, प्रदीप सुपडा बेलोकार, जावा गंगा संदीप बेलोकार, जया प्रदीप बेलोकार या जबाबदार असल्याचंही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेने दिपालीच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला असून दिपालीच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीये.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment